आज सायंकाळी खानापूर फीश मार्केट जवळ जनता गँरेज समोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल पडुन घसरत गेल्याने डोक्याला मार बसून शींदोळी ता खानापूर येथील युवक अनील मादार वय अंदाजे 22 वर्षे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला असता बघ्यांची गर्दी जमली पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते शेवटी तेथुन जाणारे रूमेवाडी गावचे माजी सैनिक यशवंत घाडी यानी जनता गँरेजचे मालक प्रसाद पाटील यांच्या सहकार्याने त्या युवकाला आपल्या दुचाकीवरून सरकारी दवाखान्यात दाखल केले व युवकाच्या मोबाईल वरून त्याच्या घरच्यांना याची कल्पना दिली, डॉक्टरांनी ताबडतोब प्रथमोपचार करून परीस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविले,