
खानापूर-लोंढा-रामनगर मार्गावर कामतगा कत्री नजीक, दुचाकी ला अपघात दोघे युवक गंभीर जखमी
खानापूर : खानापूर-लोंडा-रामनगर मार्गावर कामतगा कत्रीच्या पुढे, रस्ता अर्धवट स्थितीत असलेल्या, हत्ती ब्रिज वर सुरक्षेसाठी मारलेल्या आडव्यापट्टीचा अंदाज न आल्याने दुचाकी आहे, त्या वेगात ब्रिजवरील पट्टीवर आढळल्याने, दुचाकी वरील दोघं युवक गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गडहिंग्लज येथील दोघे युवक दांडेलीहून बेळगाव मार्गे गडहिंग्लज कडे जात असताना, कामतगा कत्रीच्या पुढे, हत्ती ब्रिज व रस्ता काम अर्धवट स्थितीत असलेल्या, ब्रिजवर आडवी पट्टी मारण्यात आली होती. परंतु आडवी पट्टी दिसली नसल्याने, तसेच त्या ठिकाणी धोका असल्याचा फलकही लावण्यात आला नसल्याने, सदर दुचाकी स्वराला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी आहे, त्या वेगात जाऊन आडव्या पट्टीवर आढळली. व दोघे युवक बाजूला फेकले गेले. पाठीमागे बसलेल्या युवकाचे हेल्मेट फुटले असून, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर एका युवकाला गंभीर मार बसला असून, त्याचे दात मोडले असल्याचे समजते. गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे नवीन दालायत व दीपक असल्याचे समजते.
अपघात झाला त्यावेळी माडीगुंजी येथील युवक महेश गडवीर गोव्याहून आपल्या दुचाकीवरून गुंजीकडे येत असताना, त्याने हा अपघात पाहिला व ताबडतोब याची सूचना गुंजी येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे यांना दिली, असता, ताबडतोब पंकज कुट्रे यांच्यासह संतोष पाटील, संजय बंदोडकर, महेश गडवीर, बबन घाडी, किरण घाडी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व मदत केली. व सदर अपघाताची कल्पना ॲम्बुलन्सला देऊन ॲम्बुलन्स बोलावण्यात आली. व त्या दोघांना उपचारासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्राकडे पाठविले. त्या ठिकाणी दोघा युवकावर प्रथमोपचार करून, त्या दोघांना पुढील उपचारासाठी बेळगाव कडे पाठविण्यात आले.
वरचेवर होणाऱ्या या अपघातांना जबाबदार कोण?
व्ही एम म्हात्रे कंपनी दोन वर्ष झाली. या महामार्गाचे काम करत आहे. 15 ते 20 दिवस झाले काम बंद आहे. महत्वाचे म्हणजे एकाही ठिकाणी आवश्यक असलेली सुरक्षा केलेली नाही. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि धोका वजा सूचना असलेले नाम फलक व सुरक्षा नसल्यामुळे, या महामार्गांवर वारंवार असे जीव घेणे अपघात होत आहेत. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
