
बेळगाव : निपाणी – मुदोळ राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला असून कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन नवविवाहित दांपत्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल बेळगाव जिल्ह्यातील मुलगी जवळी हळ्ळूर गावाजवळ घडली आहे,
महाराष्ट्रातील इंद्रजीत मोहन दम्मनगी ( 27) आणि कल्याणी इंद्रजीत दम्मनगी ( 24 ) यांचा लग्नाच्या दहाव्या दिवशी अपघात होऊन जागीच मृत्यू झाला, नवविवाहित जोडपे शनिवारी कार मधून बदामी येथील बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत असताना निपाणी – मुदोळ राज्य महामार्गावर कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी मुडलगी पोलीस करत आहेत,
