
शहिद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या टिमचा हिस्सा होते.
चिपळूण : भारत चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह चिपळुणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततच्या पावसामुळे बर्फवृष्टिमुळे 24 मार्च रोजी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले ते मातीच्या व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
याची माहिती मिळताच भारतीय सेना दलानी सहा दिवस त्यांचा शोध घेतला. त्यानंतर अथक प्रयत्न करून भारतीय सेनेच्या बहादुर सैनिकांनी भल्या मोठ्या चिखल दगड बर्फाच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या शहिद सुभेदार अजय ढगळे व इतर चार जवानांचे पार्थिव मिळाले. या चारही जवानांना शोध घेण्यासाठी गेलेल्या सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून शोधून काढले. शहिद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या टिमचा हिस्सा होते. त्यांचा पार्थिव देह सोमवारी मोरवने गावी आणण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या गावी सध्या शोकाकुळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
