
गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.
गोंदिया : लग्न सोहळ्यावरुन घरी निघालेल्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला यात तीन मुलांचा आणि वडिलांचा मृत्यु आहे आहे. गोंदिया येथे ही घटना घडली. घटनास्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात मृत्यु झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे.
गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
