
खानापूर : संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे गुरूवार दि 30 मार्च पासुन सुरू असलेल्या ह भ पं संत श्री बाबुराव महाराजांचा पुण्यतिथी उत्सव व दिंडी सोहळ्याची समाप्ती शुक्रवारी दि 31 मार्च रोजी महाप्रसादाने करण्यात आली,
दुपारी 12-30 वा महाप्रसादाला सुरूवात झाली यावेळी खानापूर शहर व तालुक्यातील अनेक गावातुन आलेल्या भाविकांनी महाप्रसादासाठी गर्दी केली होती, उत्सव कमिटीचे अध्यक्ष विवेक गीरी यांनी महाप्रसादासाठी आर्थिक व धान्य रूपाने मदत केलेल्या भाविक व देणगीदारांचे तसेच उत्सव यशस्वी होण्यासाठी धावपळ करून मदत केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, आभार मानले आहे, सायंकाळी संपूर्ण खानापूर शहरात या उत्सवाचची पालखी व दिंडी काढण्यात येऊन समाप्ती करण्यात आली यावेळी संपूर्ण शहरात महिला वर्गाने रस्ते झाडून स्वच्छ करून त्या ठिकाणी रांगोळी काढली होती,
या उत्सव कमिटीचे पदाधिकारी म्हणून खालील व्यक्ती कार्यरत आहेत,
अ ध्यक्ष – विवेक गीरी
उपाध्यक्ष – हरीभाऊ वाघधरे,
सेक्रेटरी – दतात्रय क पाटील,
उप सेक्रेटरी – संतोष शं परमेकर,
खजिनदार – पुंडलीक वा खडपे,
उप खजिनदार – सागर रा पाटील
