
खानापूर : काल रात्री आठच्या दरम्यान खानापूर येथील आपले काम आटवून आपल्या जळगे हट्टी गावाकडे जात असलेल्या बाईक स्वाराला समोर असलेल्या सायकल स्वाराचा अंदाज न आल्याने त्याने त्याला ठोकरले असता दोघेही जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडले सायकल स्वाराला किरकोळ जखम झाली तर मोटर सायकल स्वार थोडा वेळ बेशुद्ध होता

नेमकं त्याच वेळी आवरोळी मठाच्या बैठकीसाठी जात असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुकाध्यक्ष संजय कुबल माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, भाजपाचे प्रकाश गावडे “आपलं खानापूर” चे संपादक माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी हा अपघात पाहिला असता ताबडतोब त्यांनी गाडी थांबवून बाईक स्वाराला शुद्धीत आणून पाणी पाजण्यास दिले दोन्ही जखमीना बाजूला बसवून धीर दिला नेमके याच वेळी होनकल गावचे सामाजिक कार्यकर्ते आनंत जुंझवाडकर त्या ठिकाणी आले असता त्यांनी जखमी बाईक स्वराला ओळखले व आपल्या गाडीवर बसवुन प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यास घेऊन गेले, रूमेवाडी क्रॉस ते गोवा कत्री या रस्त्यावरील वळण व रस्ता धोकादायक अपघात ग्रस्त क्षेत्र बनले असून या ठिकाणी कायम अपघात होत असतात बरेच लोक जखमी व मृत्युमुखी पडलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी सदर ठिकाण अपघात ग्रस्त क्षेत्र असल्याचे दर्शविणारे फलक लावण्यात यावेत अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपा नेते मंडळींनी केली असून याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर ठिकाणी धोका फलक लावण्यास सांगणार असल्याचे भाजपा च्या पदाधिकारीनी “आपलं खानापूर” शी बोलताना सांगितले
