छत्तीसगडमधील कांकेर इथं आज (गुरुवार) दुपारी झालेल्या अपघातात सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. सर्व मुलं शाळा सुटल्यानंतर ऑटो रिक्षानं घरी परतत होती.
दरम्यान, वाटेत ट्रकनं ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच मुलंही जखमी झाली आहेत. माहिती मिळताच, पोलिसांनी जखमी मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं, तेथून त्यांना कांकेरला रेफर करण्यात आलं. कांकेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर 12 मुलं ऑटोमधून घरी परतत होती. दरम्यान आयुष केंद्र चिल्हाटी चौकात भरधाव ट्रकनं ऑटोला धडक दिली. धडकेनंतर ऑटोचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात रुद्रदेव (7), रुद्राक्षी (6), इन्सान मांडवी (4, रा. बनौली) आणि मानव साहू (6, रा. आसरा) या मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, ऑटोचालकासह सात मुलं जखमी झाली आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी मुलांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना कांकेर इथं रेफर करण्यात आलं. इथंही तीन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी तीन मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं आहे. अपघातात ऑटोचालकही गंभीर आहे. सर्व मुलं बीएसएनएन डिजिटल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. ते प्राथमिक वर्गात शिकत होते.