
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,
ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
