
प्रतिनीधी/ नागेश कोलेकर
खानापूर तालुक्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असुन कृषी अधिकार्यानी आपल्या विभागामार्फत, नुकसान झालेल्या पिकांची पहाणी व पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे त्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे,
उस, भात, पालेभाज्या,आदी पिकांचे नुकसान झाले असुन शेतकऱ्याने मेहनतीने केलेल्या लागवडीची पिके हाता-तोंडासी आल्यावर, अशी परिस्थिती उद्भवली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले दिसून येत आहे. या परिस्थितीत खानापूर तालुक्यातील पिकांचे, स्वतंत्रपणे प्रति एकरी प्रति पिकांप्रमाणे किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचे सरसकट पंचनामे करावेत.
शेतकऱ्यांना अवेळी-अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासनाकडून शक्य तितक्या लवकर प्राप्त करुन देण्यासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींनी व तालूक्यातील नेतेमंडळीनी पुढाकार घ्यावात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अवकाळी पावसामुळे होणा-या नुकसानीबाबत, भरपाई मिळण्याकरीता तालुका प्रशासन संबंधित कृषी खात्याचे अधिकारी व पिक विमा भरलेल्या कंपनीचे अधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावीत………
