
खानापूरचे आमदार ॲक्शन मोडवर, माजी आमदारांना, चित्रफित द्वारे चोख उत्तर.
खानापूर : खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी, एक चित्रफित जाहीर करून, माजी आमदार अंजलीताई निंबाळकर, यांनी लैला शुगरवर केलेल्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे.
त्यांनी जारी केलेल्या चित्रफितीत ते म्हणत आहेत. भाग्यलक्ष्मी आणि लैला शुगर यांच्याकडून, आपण चालवायला घेतलेल्या साखर कारखान्यात, सहाशे कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. असा आरोप आपण आपल्या हस्तक पत्रकारांना हाताशी धरून बिन बुडाची खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे हे चुकीचे आहे. सद्या नवीन कारखाना उभारण्यासाठी, शुगर को जनरेशन आणि डिस्टलरी याच्यासह खर्च अंदाजे तीन कोटी रुपये येतो. आणि तुम्ही आमच्यावर केलेल्या सहाशे कोटीच्या आरोपा मधुन, असे दोन कारखाने उभारण्यात येथील, आपण अंजलीताई निंबाळकर शुगर प्रायव्हेट लिमिटेड, या नावाने गेली पाच वर्षापासून कारखाना उभारण्यासाठी, त्रास भोगून आता घरी बसला आहात त्यामुळे तुम्हाला असल्या गोष्टी सुचत आहेत. एक नारळाचे श्रीफळ आमच्याकडून घेऊन, लैला शुगर ने आमच्या हातात हा कारखाना चालवण्यासाठी दिला आहे. सहाशे कोटीचा आपण आमच्यावर आरोप केला आहे. आपण चांगल्याप्रकारे चौकशी करून सहाशे कोटी रुपये सरकारला मिळवून द्यावेत. असे आमचे तुम्हाला आव्हान आहे. तसेच गेले सहा महिने खानापूर तालुक्यातील जनता, तालुक्यात काय नाटक सुरू आहे. हे पाहत आहे. एकदा खुर्ची गेल्यानंतर काय त्रास होतोय, हे जनता पहात आहे. आपणाला अजून जे जे काही करायचे असेल ते करा. कारण मुख्यमंत्री, सरकार, आणि पोलीस तुमचेच आहेत. जे काय त्रास द्यायचे आहेत ते मला करा. पण तालुक्यातील जनतेला नको, आज तुम्ही ज्या प्रकारे वागत आहात, ते पाहिले तर तुमची खुर्ची गेल्यामुळे, तुम्हाला झोप लागत नाही असे दिसून येते, आणि येथून पुढे झोप लागणार पण नाही. तालुक्यातील जनता शहाणी आहे. आपण माझ्यावर जे आरोप केला आहे. त्याच्यावर जनता, मंथन करून मला शासन करतील, किंवा तुम्हाला करतील हे जनता ठरवेल.
आम्ही साखर कारखाना चालवायला घेतल्यानंतर शेतकऱ्यांची बिल, वजन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुरवत आहोत. मला शेतकऱ्यांचे भले करायचे आहे. म्हणून मला जनतेने निवडून दिलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका, जोसेवा करतो त्याला चांगले उत्तर मिळते. असे चोख उत्तर आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांना दिले आहे.
ಖಾನಾಪುರ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಿಗೆ ಚಿತ್ರಫಿಟ್ ಮೂಲಕ ತೀಕ್ಷ್ಣ ಉತ್ತರ.
ಖಾನಾಪುರ: ಲೈಲಾ ಶುಗರ್ ವಿರುದ್ಧ ಮಾಜಿ ಶಾಸಕಿ ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಮಾಡಿರುವ ಆರೋಪಕ್ಕೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಿಪ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ತಕ್ಕ ಉತ್ತರ ನೀಡಿದ್ದಾರೆ.
