
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटकात राज्यभर विजय संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. आज दि 01 फेब्रुवारी 2023 रोजी नंदगड तालुका खानापूर येथे माजी आमदार भाजपा नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी परिपत्रके वाटून विजय संकल्प अभियान राबविण्यात आले व जनजागृती करण्यात आली. यावेळी भाजपा नेते पी एल डी बँकेचे माजी चेअरमन श्री विजय कामत, श्री प्रसाद हु पाटील, श्री बाबासाहेब देसाई, श्री गुरुलिंग चिंधी ग्राम पंचायत सदस्य श्री प्रदीप पवार, श्री सुरेश देगांवकर, कु गजानन झुंजवाडकर, श्री राजेश पाथार्डे व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



