खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक शेळ्यांवर उपचार सुरू आहेत.
तोलगी गावातील बारमाव्वा करप्पा जुंजन्नावर यांच्या चार शेळ्या आणि रुद्रप्पा रंगन्नावर यांच्या चार शेळ्यांचा मृत्यू झाला असून एकूण आठ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांना तालुका प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावीत अशी मागणी नेगीला योगी सुरक्षा रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष बसनागौडा पाटील यांनी केली आहे.
यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक श्री.महांतेश गोवरी, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष मल्लाप्पा भांगी व जिल्हा सचिव पदादय चिक्कमठ व शहर नेते उपस्थित होते.