खानापूर – देशातील विविध राज्यात तापमानात बदल झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील अनेक भागात थंडी पुन्हा वाढली आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते.
मात्र, सोमवारपासून ढगाळ वातावरण हळूहळू कमी होऊन आकाश निरभ्र होऊ लागले. त्यातच दक्षिण भारताकडून येणारे बाष्पयुक्त वारेदेखील कमी झाले.
उत्तर भारताकडून राज्याकडे येणार्या थंड वार्यांचा वेग वाढला. त्यामुळे पुन्हा थंडी जोरात सुरू झालि आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पश्चिमी चक्रवात हिमालयीन भागात पुन्हा सक्रिय झाला आहे, यामुळे ईशान्य भारतातील सर्व राज्ये तसेच मध्य प्रदेशच्या बहुतांश भागांत थंडीचा कहर वाढायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बेळगाव आणि परिसरातही थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसात बेळगावातील तापमान 12 अंशा पर्यंत घसरले आहे. वाढत्या थंडी बरोबरच जागोजागी शेकोट्या ही पेटलेल्या पाहायला मिळत आहे.
खानापूर, बेळगांव परीसरात थंडीच्या प्रमाणात वाढ, ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटल्या,
Leave a comment
Leave a comment