खानापूर पाटील गार्डन येथे आज खानापूर तालुका परिवर्तन शिक्षक पॅनल कडून या वर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शासनाकडुन वेगवेगळ्या संस्थेतून तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मीळवीलेल्या 62 व जिल्हा आदर्श शिक्षक मीळवीलेले पाच शिक्षक बसवराज व्हि गडद, डी व्ही कुंभार, गोपाळ पाटील, एस जी गावडे, व एस बी केलीकलार यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला,
यावेळी झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी बी एम हिरेमठ होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष असलेले बी बी चापगांवकर यांनी केले तर मनोगत कृष्णा कौ़दलकर यांनी केले,
यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष जयकुमार हेबळी, एस एन कमार, जिल्हा पदाधिकारी तसेच निवृत्त शिक्षक राष्ट्रपती पदक विजेते आबासाहेब दळवी, ए बी मुरगोड, नारायण पाटील, बी एम भोसले बी बी पाटील,ए एस पतार, एस व्ही कुजगी, अर्चना पाटील, फर्नांडीस मँडम, अशोक पतार,एन पी एस अध्यक्ष संतोष पाटील,हे उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश कवळेकर यांनी केले, तर आभार जी पी पाटील यांनी मांडले,