काहींनी आपल्याबद्दल अपप्रचार चालविला आहे. असे असताना आपल्या पाठीशी कोणीच उभे राहिलेले नाही. काही जणांकडून आपल्याला धमक्याही आल्या. यासह अन्य काही कारणे नमूद करणारे डेथ नोट स्वामीजींनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवले आहे.रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडे मठाचे स्वामीजी बसवलिंग यांनी मठातील आपल्या खोलीच्या खिडकीला दोर अडकवून स्वतःला गळफास लावून घेऊन स्वतःचे जीवन संपविले आहे.
रामनगर, दिनांक 24 : कंचुगल बंडे मठाच्या बसवलिंग स्वामीजींनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे 45 वर्षीय स्वामीजींनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानी डेथ नोट लिहिल्याचे सांगण्यात येत आहे
रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील सर्वात मोठा मठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंडे मठाच्या स्वामीजींनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. या मठाच्या आवरणात शाळा आणि महाविद्यालय चालविले जाते. या मठाची मालमत्ता 50 कोटी हून अधिक आहे.
स्वामींच्यावर काही आरोप झाल्याने आपल्या इज्जतीला घाबरून स्वामीजींनी आत्महत्या केली असावी अशी हळुवार कुजबूज परिसरात ऐकावयास मिळाल्याचे सांगण्यात येते.