
खानापूर : होनकल येथील 12 वी च्या महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन रमेश तोराळकर यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उजेडात आली,
सदर विद्यार्थी 12 वी च्या वर्गात शिकत होता व सद्या त्याची 12 वी ची परीक्षा सुरू होती, त्याचे आई वडील शेतात वीटा मारण्याचे काम सुरू असल्याने शेतातच वस्तीला होते, रात्री शेतात जेवन झाल्यानंतर झोपण्यासाठी चेतन हा गावातील घरी गेला होता व आज सकाळी पेपर असल्याने चेतन नाष्टासाठी शेतात का आला नाही म्हणून आई वडीलांनी घरी येवुन पाहीले असता सदर घटना उजेडात आल्याचे समजते सदर गुन्हाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली असून उतरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर होनकल येथे अंतीम संस्कार करण्यात आले, सदर घडलेल्या या दुदैवी घटनेबद्दल लोकातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,
