
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी च एका महिलेने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली.
पती कर्जबाजारी झाल्याने महिलेने स्वतः फिनेल पिऊन आपल्या तीन मुलींना फीनेल प्यायला दिले
ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ध्यानात येताच त्वरित त्यांनी तेथे असलेल्या पोलिसांना सांगून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव सरस्वती अदृष्यप्पा हंपण्णवर (४०) असून मुलींची नावे सृष्टी (१४),साक्षी (८) आणि सान्वी (३) अशी आहेत.सरस्वतीचा पती कर्जबाजारी झाला होता.त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी तो पत्नी आणि मुलींना सोडून घर सोडून निघून गेला आहे.आता आपला उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत असलेल्या सरस्वतीने आपल्या मुलीसह जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास गेली.
त्यावेळी तेथे जिल्हाधिकारी कार्यालयात तिने मुलींना ज्यूस प्या म्हणून फिनेल प्यायला दिले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित पोलिसांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची तब्येत सुधारत आहे.
