
मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूलची हाॅकीतही विजयी पताका कायम! राज्यस्तरीय निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षांव.
खानापूर ; मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी हायस्कूल खानापूर, या शाळेने आपला शैक्षणिक अलेख कायम उंचावत ठेवला आहे. बौद्धिक स्पर्धेत येथील विद्यार्थ्यींनी तालुक्यात अव्वल स्थानी नेहमीच असतात. आजवर दहावीच्या वार्षिक परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावरही आपली वेगळी ओळख निर्माण करून आहेत. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू या संस्थेतील खेळाडू विद्यार्थ्यावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. कारण आपल्या संस्थेतील खेळाडू विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर योगदान देवून देशाभिमान वाढवावा हा त्या पाठीमागे मनोदय असून, याचाच परिणाम म्हणजे यावर्षी घेण्यात येत असलेल्या प्रत्येक क्रीडा प्रकारात, मग तो खेळ सांघिक असो वा वैयक्तीक येथील खेळाडू विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादन करत क्रीडांगणावर ठेवण्यात आलेले खेळाचे चषक आपल्या नावावर केले आहेत. कबड्डी, थ्रो बाॅल, खो खो व्हाॅलीबाॅल या खेळात पारंगत असणारे येथील खेळाडू आता हाॅकी मध्येही शाळेचा नावलौकिक वाढवित आहेत. नुकत्याच झालेल्या डिव्हिजनल लेव्हल व्हाॅकी स्पर्धेत खानापूरचं नेतृत्व करणाऱ्या या संघाने जिल्ह्यात अव्वलस्थानी मजल मारत मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा झेंडा अखेर आपल्या राज्यस्तरीय निवडीसह, निर्विवाद फडकविला आहे. मैसूर येथील राज्यस्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेसाठी या विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. या संघात कुमारी मयुरी कंग्राळकर, नेत्रा गुरव, साक्षी पाटील, साक्षी चौगुले, आयेशा शेख, सविता चिकदिनकोपकर, प्रतीक्षा गुरव, सानिका पाटील, प्रीती नांदुडकर, श्रेया पाटील आहेत. शाळेच्या कल्पक क्रिडाशिक्षिका श्रीमती आश्विनी टी पाटील व श्री वाय एफ निलजकर हाॅकी क्रीडा मार्गदर्शक व हाॅकी फेडरेशन बेळगावचे अध्यक्ष श्री सुधाकर चाळके, शाळेचे मुख्याध्यापक श्री राहूल एन जाधव. मुख्याध्यापक श्री के व्ही कुलकर्णी. प्राचार्य ए एल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांचे प्रोत्साहन मिळाले आहे. संचालक श्री शिवाजीराव पाटील व ज्येष्ठ संचालक श्री परशराम गुरव यांची प्रेरणा मिळाली आहे. व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे. या संघातील हाॅकी खेळाडूंचे बेळगाव जिल्ह्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
