बेळगाव दिन 22. बेळगाव येथील मराठी प्रेरणामंच साच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेले आहे. अशा गुणी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र ‘देऊन एका खास कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ गोपाळ पाटील यांनी दिली.
बेळगाव शहरातील मराठी माध्यमच्या शाळेतील अनुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार, पाच हजार, तीन हजार दोन हजार, आणि एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
याच प्रमाणे बेळगाव ग्रामीण विभागातून मराठी माध्यमच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या अनूक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये, 5 हजार रुपये, 3 हजार रुपये दोन हजार रूपये, व एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमच्या शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या अनुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये, पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
बेळगाव व खानापूर तालुक्यातील ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार असून एका शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे. असे डॉ गोपाल पाटील यांनी सांगितले आहे.
तसेच सहावे बक्षीस पाचशे रूपये, व सातवे बक्षीस 500 रुपये, अशी एकूण सात बक्षिसे प्रत्येक विभागात देण्यात येणार आहेत.