
खानापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान मलप्रभा क्रीडांगण खानापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या कुस्ती मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेख मोहोळ महाराष्ट्र याने प्रतिस्पर्धी हरियाणा केसरी विशाल भोंडू याला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तेराव्या मिनिटाला दुहेरीपट डावावर चित्तपट केले व त्याला आसमान दाखविले.
कुस्ती आखाड्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती पै सिकंदर शेख मोहोळ विरुद्ध पै विशाल भोंडू हरियाणा यांच्यात रात्री उशिरा लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील व भाजपाचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, ज्योतिबा रेमानी, सुरेश देसाई, चांगाप्पा नीलजकर, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, मल्लाप्पा मारीहाळ व कुस्ती संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्ही पहिलवान तितक्याच ताकतीचे असल्याने सुरुवातीला आपापल्या डावपेचात अडकविण्याचा प्रयत्न केला परंतु तेराव्या मिनिटाला सिकंदर शेखने यात बाजी मारली पंच म्हणून कृष्णा पाटील व कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुनील फडतरे मुदोळ विरूद्ध संदीप मोटे सांगली यांच्यात खानापूर कुस्ती संघटनेच्या हस्ते लावण्यात आली. यात संदीप मोटे यांनी पंधराव्या मिनिटाला विजय मिळविला तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे दावणगिरी याने प्रतिस्पर्धी लक्ष्मण डागर दिल्ली याच्यावर एकलांगी डावावर विजय मिळविला. आखाड्याचे उद्घाटन लैला शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक चांगाप्पा नीलजकर, जनरल मॅनेजर तुकाराम हुंद्रे, बाबुराव देसाई, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव बामणे, कार्याध्यक्ष जयवंत खानापूरकर संघटनेची सेक्रेटरी शंकर पाटील, कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी भाजपचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, याची कुस्ती पंकज चापगाव विरुद्ध महेश तीर्थकुंडये यांच्यात झाली. खानापूर पीकेपीएस चे संचालक सुरेश सुळकर यांच्या हस्ते लावण्यात आली यामध्ये महेश तीर्थकुंडे याला पॉइंटवर विजयी घोषित करण्यात आले, या आखाड्यात पै मनीष कुमार दिल्ली, कामेश कंग्राळी, रोहित
कंग्राळी, हनुमंत इंगळगी, पवन चीकदिनकोप, राजू गंदीगवाड, पार्थ कंग्राळी, विनायक बेकवाड, प्रेम जाधव, दर्शन कंग्राळी, मुबारक गंदीगवाड, वैष्णव कुद्रेमनी, राजू शिनोळी, पीसीलिंग बिडी, हनुमंत उचवडे, सतीश संतीबस्तवाड, श्रीनाथ बेळगुंदी, समीर रनकुंडे, किरण मच्छे, विश्वास बेळगुंदी, हर्षवर्धन साके, शरद पाटील, आदिनाथ चापगाव, स्वप्निल सावगाव,
आदींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला आखाड्यातील 55 कुस्त्यापैकी चार कुस्त्या बरोबरीत सुटल्या तर अन्य सर्व कुस्त्या निकाली झाल्याने हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले, पंच म्हणून कृष्णा पाटील, हनुमंत पाटील, बाळाराम पाटील, यशवंत अल्लोळकर, विठ्ठल अडकुरकर, पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम गुरव, मधु पाटील, रुद्रप्पा हेंडोरी, निवृत्ती पाटील, प्रकाश तीर्थकुंडये, शिवाजी मंडोळकर, बाबू कल्लेहोळकर, मारुती तुळजाई, विश्वनाथ पाटील कृष्णा पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, हनुमंत गुरव, सुरेश सुळकर, लक्ष्मण पाटील, यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्त्यांचे समालोचन कृष्णा चौगुले, शंकर पाटील, प्रकाश मजगावी, मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले आखाड्यात माजी आमदार अरविंद पाटील, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, ज्योतिबा रेमानी, सुरेश देसाई, शंकर पाटील, राजेश मडवाळकर, व आदी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला,
तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार करण्यात येणार होता परंतु ते परगावी असल्याने वेळेत पोहचू शकले नाहीत. परंतु त्यांनी कुस्ती संघटनेला आपल्या शुभेच्छा पाठविल्या व सर्वांचे आभार मानले आहे.
