
बेळगाव : कर्नाटक राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना 10% टक्के अनुकंपा गुण ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दहावी परीक्षा मंडळाचे संचालक रामचंद्र यांनी आहे
कर्नाटक राज्यात 31 मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून आतापर्यंत दोन पेपर सुरळीत पार पडले असून तिसरा पेपर गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे दहावी परीक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण घोषणा करताना गतवर्षीप्रमाणे यंदाच्या परीक्षेत देखील दहा टक्के अनुकंपा गुण ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दहावी परीक्षा मंडळाचे संचालक रामचंद्र यांनी दिली आहे
कोरोना बॅच म्हणून यंदा देखील दहा टक्के ग्रेसमार्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन वर्षापासून कोरोनामुळे दहा टक्के ग्रेस मार्क देण्यात येत आहेत तोच निर्णय यावर्षी सुध्दा लागू करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे त्यामुळे दहावीच्या निकालात पास होण्याचे प्रमाण वाढणार नक्कीच वाढणार यात शंका नाही,
