
कुमारी आकांक्षा गणेबैलकर महिला ओपन मध्ये गोल्ड मेडल व प्राजक्ता मरगाळे 18 वर्षे खालील महिला गटात गोल्ड मेडल
बेळगाव येथे रविवार दिनांक 02 एप्रिल 2023 रोजी अरिहंत हॉस्पिटल बेळगाव यांच्यावतीने अखिल भारतीय मॅरेथॉन संपन्न झाली 10 कि मी महिला व पुरुष साठी ओपनआणि 5 कि मी महिला व पुरुषासाठी 18 वर्षा खालील मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या,

अरिहंत हॉस्पिटल चे नियोजन शिस्तबद्धता अतिसुरेख होती या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता प्रोत्साहन देण्यासाठी खेल प्रेमी व उत्तम जजीश बहुसंख्येने उपस्थित होते व स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन खिलाडू वृत्तीचे दर्शन झाले
कुमारी आकांक्षा गणेबैलकर गणेबैल खानापूर हिने 10कि मी महिला ओपन मध्ये पहिला क्रमांक मिळविला आणि कुमारी प्राजक्ता मरगाळे हिने 5 कि मी 18 वर्षाखाली महिला गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला तसेच 18 वर्षाखाली पुरुष गटामध्ये कुमार समर्थ गंगाराम कदम निडगल खानापूर 4 चौथा क्रमांक मिळविला व कुमार हरीश अनिल गोरे गर्लगुंजी खानापूर 6 वा क्रमांक मिळविला,

वरील सर्व स्पर्धक हे ज्योती स्पोर्ट्स क्लब बेळगाव या ठिकाणी ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीयुत एल जी कोलेकर सर गर्लगुंज यांचे अथक परिश्रमाने मार्गदर्शनाने गरीब व होतकरु दुर्गम भागातील स्पर्धकांच्यासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे तसेच श्री अनिल गोरे. श्री गंगाराम कदम. श्री सचिन नाईक व श्री सतीश नाईक यांचे प्रोत्साहन वरील स्पर्धकांना लाभत आहे या क्लब मध्ये 25 स्पर्धक नेहमीच सराव करीत आहे या सर्व स्पर्धकांचे गौरव व अभिनंदन सर्व संघ संस्था आणि खेळप्रेमी यांच्याकडून होत आहे पुढील भविष्यासाठी या क्लबला आणि स्पर्धकांना व मार्गदर्शकाना अनेक शुभेच्छा सुभाशीर्वाद व शतशः प्रणाम खेलो भारत जितो भारत,
