
खानापूर : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट खानापूर विधानसभा क्षेत्रासह राज्यातील विधानसभेच्या 110 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते व शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के पी पाटील यांनी राजा शिवछत्रपती शिवस्मारक या ठिकाणी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश असून शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर राज्यातील निवडणूका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले,

राष्ट्रीय पक्ष मराठी माणसाना भुलथापा मारून मतदान करून घेतात व काम झाले की मराठी माणसाला दूर लोटतात ज्या ज्या वेळी मराठी माणसावर अन्याय झाला त्या त्या वेळी शिवसेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे त्या मुळे सीमाभागातील मराठी माणसांना शीवसेनेची खरी गरज असल्याने सीमाभागातील मराठी माणसांनी शिवसेनेच्या पाठीशी थांबण्याचे आवाहन हि त्यांनी केले, पुढे माहिती देताना ते म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेकी झाल्यामुळे साशंकतेचे व संभ्रमतेचे वातावरण निर्माण झाले असून वेगवेगळे गट निर्माण झाले असल्याने आज सीमा भागात खरी गरज शिवसेनेची आहे, आज पर्यंत समितीच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली असून आता वेळ आली आहे समितीच्या नेत्यांनी गट तट विसरून शिवसेना उमेदवाराच्या पाठीमागे थांबल्यास शिवसेनेचा उमेदवार नक्की निवडून येईल तसेच शिवसेनेच्या वरिष्ठांनी माझी उमेदवारी खानापूर विधानसभा मतदारसंघातून जाहीर केली असून येत्या पंधरा तारखेपर्यंत आपण आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले शिवसेनेच्या वरिष्ठांनी बी फॉर्म सुद्धा दिला असल्याचे सांगितले व यापुढे शिवसेनेचा जो आदेश असेल त्याप्रमाणेच पुढील रूपरेषा ठरवणार असल्याचे सांगितले तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत व आदी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले,
यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख नारायण राऊत, उपप्रमुख प्रकाश पाटील, राज्य मीडिया प्रमुख दतात्रय हेगडे, युवा सेना प्रमुख मोहन गुरव उपस्थित होते,
