
खानापूर ता. 24 : के पी पाटील यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसून जिल्हा आणि तालुका शिवसेनेचा म ए समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा असल्याची घोषणा शिवसेना सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागणुरी व शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी खानापुरात बैठक घेउन केली.
पुढे बोलताना नागणुरी म्हणाले, आतापर्यंतच्या सर्व निवडणुकात शिवसेनेने म ए समितीला मदत केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महराष्ट्राचे स्वप्न जोपर्यत पुर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेना समिति सोबत असेल. के पी पाटील यांच्याकडे शिव सेनेचे कोणतेही पद नसून कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण केला आहे. त्याकरीता तालुक्यातील शिव सेनेच्या कार्यकर्त्यानी समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचार कार्यात सक्रीय व्हावे. असे आवाहन केले.
यावेळी युवा समितीचे शुभम शेळके, दयानंद चोपडे, प्रवीण रेडकर, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी कार्याध्यक्ष सुरज कडूचकर, साईनाथ शिरोडकर , प्रतीक पाटील, आनंद पाटील, आशिष कोचेरी, नारायण मुंचंडीकर आदी उपस्थित होते.
