
खानापूर तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावर्षी शिवरात्रीला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल व भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांच्यासह नाथ सांप्रदायिक बाळेवाडी मठ खानापूर व आल्लोळी येथील कलमेश्वर गणेश मंदिराला “आपलं खानापूर” च्या ग्रुप सह भेट देऊन आशीर्वाद व दर्शन घेण्याचा योग आला,

प्रत्येक महाशिवरात्रीला खानापूर, असोगा, हब्बनहट्टी, हंडीभडंगनाथ या तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते, यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,

खानापूर पासून जांबोटी रस्त्याला लागून असलेले आल्लोळी येथील कलमेश्वर व गणेश मंदिराला भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह भेट देवुन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला, आल्लोळी, कान्सुली, मळव, या तिन्ही गावचे ग्रामस्थ व पंचकमीटी मिळून हा उत्सव साजरा करतात,

यानंतर खानापूर लोंढा महामार्गावरील वाटरे गावानजीक असलेल्या नाथ सांप्रदायिक “बाळेवाडी ” मठाला भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई, भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह भेट देवुन समाधीचे दर्शन घेऊन या मठाचे मठाधिस पीर महंत सींगनाथ पंत कपलाणी महाराज यांचा सर्वानी आशीर्वाद घेतला व सायंकाळच्या आरतीत सहभाग घेतला, यावेळी महाराष्ट्रातील व आजुबाजूच्या गावातील काहि भक्त मठावर दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते,
