
खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड गावात बसविण्यात येणाऱ्या शिवछत्रपतींच्या मूर्तीचे कोल्हापूरहून आज खानापुरात आगमन झाले. जांबोटी सर्कल (बसवेश्वर चौक) ते राजा श्री शिवछत्रपती स्मारक चौकापर्यंत ढाल-ताशाच्या निनादात, व भजनी मंडळ च्या ठेक्यावर वाजत, गाजत, हजारो खैरवाड वासियांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक राजा शिवछत्रपती चौकात आल्यानंतर खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मालार्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी रुक्माना जुंझवाडकर, शंकर बस्तवाडकर व खैरवाड ग्रामस्थ उपस्थित होते.
मिरवणुकीत हजारो नागरिक सामील झाले होते. महिला व नागरिकांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. मिरवणुकीत लहान मुलांनी घोड्यावर बसून बाल शिवाजी व जिजामातेचा जिवंत देखावा साजरा केला होता. तर युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्याचा पोशाख परिधान करून जिवंत देखावा साजरा केलेले चित्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. गावातील महिला सुद्धा डोकीवर कलश घेऊन मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.कोल्हापूर येथे बनविण्यात आलेली शिवछत्रपतींची ही मूर्ती आकर्षक व देखणी असून सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
10 जून रोजी होणार लोकार्पण सोहळा
खैरवाड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक उपक्रम राबवत येथील युवकांनी देणगी व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या शिवरायांच्या चौथ्यासाठी व मूर्तीसाठी सहकार्याचा हात उभारला आहे.या ठिकाणी तयार करण्यात आलेली मूर्ती खानापूर तालुक्यातील सर्वात मोठी मूर्ती राहणार आहे. सदर मूर्ती ब्रांच (पंचधातू) पासून तयार करण्यात आली असून मूर्तीसाठी तब्बल 15 लाखाहून अधिक रुपयाचा निधी देण्यात आला आहे. शिवाय या मूर्ती समवेत राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी राजे, दोन तोफा व मावळे अशा अनेक मुर्त्या सोबत आहेत. छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ मूर्तीची उंची 9ft असून रुंदी 5 फूट आहे. त्यामुळे एक आकर्षक मूर्ती खानापूर तालुक्यातील खैरवाड या ठिकाणी साकारली जाणार असल्याने या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे जल्लोषी स्वागत या ठिकाणी केले जात आहे. येत्या 10 जून रोजी भव्य थाटामाटात या मूर्तीचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಖೈರವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಿರುವ ಶಿವ ಛತ್ರಪತಿ ಮೂರ್ತಿ ಇಂದು ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ಖಾನಾಪುರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿತು. ಜಾಂಬೋಟಿ ವೃತ್ತದಿಂದ (ಬಸವೇಶ್ವರ ಚೌಕ್) ರಾಜ ಶ್ರೀ ಶಿವ ಛತ್ರಪತಿ ಸ್ಮಾರಕ ಚೌಕ್ವರೆಗೆ ಸಾವಿರಾರು ಖೈರವಾಡ ನಿವಾಸಿಗಳ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಖೈರವಾಡ ನಿವಾಸಿಗಳ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಡೋಲು, ಭಜನಿ ಮಂಡಲದ ನಾದದೊಂದಿಗೆ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಲಾಯಿತು.ಮೆರವಣಿಗೆಯು ರಾಜಾ ಶಿವ ಛತ್ರಪತಿ ಚೌಕಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ನಂತರ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ದಿಗಂಬರರಾವ್ ಪಾಟೀಲ್, ಅಬಾಸಾಹೇಬ ದಳವಿ, ಪ್ರಕಾಶ ಚವ್ಹಾಣ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರುಕ್ಮಣ ಜುಂಜವಾಡಕರ, ಶಂಕರ ಬಸ್ತವಾಡಕರ ಹಾಗೂ ಖೈರವಾಡ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.ಸಾವಿರಾರು ನಾಗರಿಕರು ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡರು. ಮಹಿಳೆಯರು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಗೆ ತೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಾಲಶಿವಾಜಿ ಮತ್ತು ಜೀಜಾಮಾತೆಯ ನೇರ ದರ್ಶನವನ್ನು ಮಕ್ಕಳು ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಯುವಕರು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಹಾಗೂ ಅವರ ಮಾವಯ್ಯನ ವೇಷ ಧರಿಸಿ ಸಂಭ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದ ಚಿತ್ರ ನಾಗರಿಕರ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತಿತ್ತು. ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರೂ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಲಶ ಹೊತ್ತು ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು.ಕೊಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ತಯಾರಾದ ಈ ಶಿವ ಛತ್ರಪತಿಯ ವಿಗ್ರಹ ಆಕರ್ಷಕ ಹಾಗೂ ಸುಂದರವಾಗಿದ್ದು ಎಲ್ಲರ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತಿತ್ತು.
