बेळगावात दि.१९ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये घेतला.
बेळगावात दि.१९ ते ३० डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन होणार आहे.बेळगावात होणारे हे दहावे हिवाळी अधिवेशन आहे.अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ,वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचारी येणार आहेत.राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी देखील अधिवेशनासाठी येणार आहेत.त्यांच्या निवास,भोजन,वाहतूक,सुरक्षा यांची व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये.वैद्यकीय सेवेची व्यवस्थाविधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी करावी.अधिवेशनासाठी येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.दोन हजार हून अधिक खोल्यांची व्यवस्था बेळगावातील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.बैठकीला जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.