
१९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे.!
या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती ‘विष्णुपंत पागनीस’ यांनी. ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकाराचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांच मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं.!
इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, ‘महाराज, हे आपलं मानधन!’ चित्रपटातील तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना ‘महाराज’ म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, ‘मानधन…. ? मी घेणार नाही.’
निर्माते म्हणाले … “महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !” विष्णुपंत म्हणाले “तरीही घेणार नाही ! आता निर्मात्यांना काही कळेना … त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार …, “म्हणाले चारपट देतो… आतातरी घ्या !’.
या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, “ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही!” निर्मात्यांनी ही त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले!
आज खऱ्या तुकाराम महाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, ही त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामांचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले.!
पागनीस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता.!!
कुणी लिहिलाय हा लेख माहिती नाही पण मला आवडला म्हणून आपल्या सोबत share करत आहे
