
श्री शंभुराजे परिवार संस्था महाराष्ट्र राज्य व ऑपरेशन मदत संस्था यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुर्ग संवर्धन हाती घेण्यात आले असून काल दिनांक 24 डिसेंबर व आज 25 डिसेंबर खानापूर तालुक्यातील सडा गावातील सडा किल्ल्यामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले
यावेळी तेथील किल्ल्याचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी तटबंदी मोहीमही राबविण्यात आली यावेळी शंभुराजे परिवार संस्था आणि ऑपरेशन मदत संस्थेचे तीनशे ते साडेतीनशे दुर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी या मोहिमेत भाग घेतला यापुढे संस्थेच्या वतीने यळूर बेळगाव येथील राजहंस गड व चंदगड येथील कलानिधी किल्ल्यावर स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार आहे,




