
खानापूर तालुक्यातील नंदगड जवळील खैरवाड गावातील नागरिक नागाप्पा आप्पाणा भुजगुरव यांच्या बंद असलेल्या घरचा दरवाजा फोडुन रोख रक्कम 75 हजार रुपये, तीन तोळे सोने, व दहा तोळे चांदी असा एकूण अंदाजे अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून

नंदगड पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास नंदगड पोलीस करत आहेत, आज सकाळी मळणी असल्याने घरातील सर्व लोक शेतात गेले असता अंदाजे दुपारी 3 च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली असल्याचे समजते,


