गुंजी, दि 8 (पंकज कुट्रे यांजकडून)
खानापूर तालुक्यातील गुंजी भागातील भालके के एच गावातील नागरिक परशराम कुट्रे यांचे बंद असलेले घर फोडून अंदाजे रू 35 हजारांची चोरी झाली आहे
घरातील सर्वजण शेती कामासाठी शेतात गेले होते याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून घरी कोण नसल्याचे पाहून घरचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एैवज लांबवल्याचे समजते परशराम कुट्रे हे गुंजी ग्रां पं ला वाटर मँन म्हणून कामाला आहेत सदर चोरी झाल्याची कल्पना फोनवरून खानापूर पोलीसांना देण्यात आल्यानंतर पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी हजर झाले असुन गुन्हा नोंदविण्याची व तपासाची प्रक्रिया सुरू आहे,