
संपूर्ण देशभरात रंगपंचमी मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली देशातील जास्तीत जास्त ठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात खेळली गेली पण खानापूर शहरासह बऱ्याच ठिकाणी तिथीनुसार म्हणजे ज्या दिवशी पंचमी असते त्या दिवशीच रंगपंचमी खेळली जाते पण रविवारी सर्वत्र शासकीय कार्यालये, बँका तसेच प्रायव्हेट कंपन्यांना सुट्टी असल्याने या कर्मचाऱ्यांना आपल्या सहकार्यासोबत रंगपंचमी खेळता येणार नाही म्हणून आज काही शासकीय कार्यालय व बँक कर्मचाऱ्यांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली
खानापूर येथील कॅनरा बँकेच्या दोन्ही शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घोडे गल्ली कॉर्नरला असलेल्या शाखेत बँकेची कामकाजाची वेळ संपल्यानंतर एकमेकांना रंग लावून होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन रंगपंचमी मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी केली यावेळी आपलं खानापूर न्यूज चे संपादक दिनकर मरगाळे हे सुद्धा उपस्थित होते
