
यावर्षी सुद्धा पंचमी च्या निमित्ताने रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण शहर रंगीबेरंगी झाले होते, यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने एक आगळ्या वेगळ्या उत्साहाच्या वातावरणात रंगपंचमी संपन्न झाली
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा तिथीप्रमाणे पंचमीला रंगपंचमी संपूर्ण शहर आणि तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागातील गावात सुद्धा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
खानापूर शहरात गल्लोगल्ली डॉल्बीच्या ठेक्यात संपूर्ण तरुण वर्ग नाच गाण्यात दंग होऊन रंगात नाहून निघाला होता स्टेशन रोड येथील महालक्ष्मी मंदिरासमोर मोठ्या उत्साहात आणि संपूर्ण शहरातील युवकांच्या उपस्थितीत सर्वात मोठी रंगपंचमी साजरी केली जाते, आजूबाजूच्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्या ठिकाणी संपूर्ण शहरातील गल्लीबोळातून युवक वर्ग उपस्थित राहून रंगपंचमीच्या रंगात नाहून निघाला होता शहरातील संपूर्ण रस्ते रंग खेळणाऱ्या युवक युवतींच्या मुळे फुलून गेले होते बऱ्याच ठिकाणी महिलांनी सुद्धा उपस्थित राहून आपापल्या गल्लीमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली,

रंगपंचमी खेळल्यानंतर तरुण युवा वर्गाने काही ठिकाणी आपापल्या ग्रुप सह जेवणावळीचे आयोजन केले होते त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहून जेवणावळीचा आनंद लुटला तर तालुक्यात रंगपंचमीच्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या मित्र परिवारासाठी व समर्थकांसाठी जेवणावळीचे सुद्धा आयोजन केले होते,
