
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राजोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव शिस्तबद्ध आणि भव्यपणे साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.आज सोमवारी (दि. 10) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वतयारीच्या प्राथमिक बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत कर्नाटक राज्यसभेच्या सोहळ्यासंदर्भात व्यापक स्वरूपात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर टिळकवाडी तिसऱ्या उड्डाणपुलाला दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली आहे.
राजोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शिस्तबद्ध उत्सवासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
