
रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. सोमवारी एकाचवेळी युक्रेनची अनेक शहरं रशियन मिसाइल स्ट्राइकन हादरली. नुकताच क्रिमिया आणि रशियाला जोडणारा एका पूल स्फोटामध्ये उडवून देण्यात आला. त्यानंतर रशियाकडून युक्रेनवर इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ब्रिजवर झालेल्या हल्ल्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यूक्रेनला जबाबदार धरलं होतं. आजच्या मिसाइल स्ट्राइककडे प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जातय.
“युक्रेनवर मिसाइल हल्ला झालाय. देशातील अनेक शहरात हल्ला झाल्याची माहिती आहे” असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रशियाने युक्रेनवर 75 मिसाइल्स डागले, असं कीवकडून सांगण्यात आलं.
