
राजवाडा, जांबोटी येथे सालाबादप्रमाणे पावणाई देवीचा वसंतोत्सव साजरा करण्यात आला. वसंतोत्सवाच्या निमित्ताने नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते, सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सरदार कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांनी भूषविले.

नाटकाचे उदघाटन भाजपा नेते श्री विठ्ठल हलगेकर यांनी केले. दिपप्रज्वलन भाजपा महिला कार्यकारीणी सदस्या सौ धनश्री सरदेसाई तसेच माजी झेडपी श्री बाबूराव देसाई, भाजपा तालुका अध्यक्ष श्री संजय कुबल, माजी झेडपी श्री जयराम देसाई, प्रतिष्ठीत पंच श्री विठ्ठल देसाई व समिती चे नेते निरंजन सरदेसाई यांनी केले. विविध देवदेवतांचे पूजन श्री मुरलीधर पाटील, श्री आबासाहेब दळवी, श्री गोपाळ देसाई, जांबोटी पीकेपीएस चे सदस्य जयवंत देसाई, जांबोटी ग्रामपंचायत चे सदस्य सुनील देसाई यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध पक्षांचे नेते मंडळी, ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते.



