
पिंगुळीं येथील “ठाकर आदिवासी कला आंगण” या संस्थेला खानापूर येथील लोकसंस्कृती नाट्य कला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन या कला आंगण चे संस्थापक, व पिंगुळी चित्रकथी परंपरेतले मोठे नाव पद्मश्री श्री परशुराम गंगावणे व त्यांचे चिरंजीव श्री चेतन गंगावणे यांची कुडाळ मुक्कामी भेट घेतली,

श्री गंगावणे यांना 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, चित्रकथी, कळसूत्री, छायानाटय, हस्त बाहुली या पारंपारिक लोक कलेवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली, व खानापूरातील लोक संस्कृती नाट्य कला संस्थेला भेट देण्याचे त्यांना निमंत्रण देण्यात आले, या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजीत कालेकर, संस्थापक संचालक श्री नागेश बोबाटे, सर्वश्री, सूरज मादार, प्रमोद गावडा, संतोष सुतार, शिवानंद पाटील, सदानंद मराठे, कपिल होसुरकर आदी खानापुरातील कलावंत उपस्थीत होते,

