
नंदगड येथे दोन मार्च 2023 रोजी सकाळी 10-00 वाजता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात होणार असून सदर उदघाटन कार्यक्रमाला व सभेला खानापूर कित्तूर बैलहोंगल बेळगाव परिसरातून 30 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे भाजपा तालूका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी सांगितले आहे, यावेळी माजी आमदार अरविंद पाटील भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, महिला कार्यकारणी सदस्या धनश्री सरदेसाई, तालुका पंचायत माजी सदस्या वासंती बडीगेर, किरण यळूरकर, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी भूविकास बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, वननिगमचे राज्य संचालक सुरेश देसाई, तालुका पंचायत माजी सदस्य अशोक देसाई, आधी जण उपस्थित होते

कर्नाटक राज्यात रथ यात्रेसाठी चार विभाग बनविण्यात आले असुन नंदगड येथुन क्रांतीवीर संगोळी रायान्ना यांच्या समाधी स्थळाला हार घालून सदर रथयात्रेला सुरुवात होणार आहे या रथयात्रेला विभाग क्रमांक दोन नाव देण्यात आले असून सदर रथयात्रा 52 ठिकाणी फिरणार आहे, रथयात्रेला सुरूवात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, भाजपा राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील माजी मुख्यमंत्री बी एस यडीयुराप्पा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत खानापूर तालुक्यात जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून संपूर्ण तालुक्यात विजय संकल्प अभियान राबविण्यात आले असून तालुक्यातील प्रत्येक बूथ केंद्रातील घरावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले असुन तालुक्यात एकुन पंधराशे झेंडे लावण्यात आले आहेत तसेच मिस कॉल देऊन नवीन हजारो सभासद करण्यात आले आहेत तसेच तालुक्यातील प्रत्येक घरात नरेंद्र मोदी भाजपा सरकारने ज्या योजना केल्या आहेत त्याची माहिती दिलेली असुन प्रत्येक योजना रयत, नागरिक, महिला, यांना समजावून सांगण्यात आलेली आहे, त्यासाठी नंदगड येथे होणाऱ्या या सभेला उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळणार असल्याचे सांगितले तसेच सर्वांनी नंदगड येथील दिनांक 2 मार्च रोजी होणाऱ्या संकल्प यात्रेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा नेते मंडळींनी केले आहे
