आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली खानापूरातील भाजपा रयत मोर्चाच्या पदाधिकारींच्या वतीने तालुक्यातील खराब व विस्कळीत झालेले रस्ते ताबडतोब तात्पुरते दुरूस्ती करण्यात यावेत म्हणून पी डब्ल्यू डी विभागाचे मुख्य अभियंता श्री सुबराव यांना निवेदन देण्यात आले,
यामध्ये लींगनमठ-खानापूर रस्ता, शिरोली रस्ता, लालवाडी – कोडचवाड, रस्ता, बीडी – पारीश्वाड रस्ता, नंदगड ते मेरडा रस्ता, हे विस्कळीत झाले असून ताबडतोब दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली यावेळी खानापूर तालुका रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तीरवीर, मनोहर कदम, सदानंद होसुरकर, चांगाप्पा निलजकर, संतोष कदम, हणमंत खांबले, महेश बाचोळकर, परशराम गुरव, तुकाराम गवस, व आदि पदाधिकारी व कार्यक्रते उपस्थित होते,