
खानापूर : सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव येथील नवीन बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी येत असून त्यानिमित्त रोड शो व मालिनी सिटी पटांगणावर सभा आयोजित केलेली असून सदर सभेला खानापुरातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी भाजपच्या वतीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली, प्रथमतः प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत भाजपा नेते कीरण यळूरकर यांनी केले, यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले,

कर्नाटक राज्याच्या निवडणुका येत्या दोन महिन्याच्या आत मध्ये घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने मोदी यांची मालिनी सिटी पटांगणावर भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत खानापुरातूनही जवळजवळ 25 हजार कार्यकर्ते सदर सभेला उपस्थित राहणार असून या दृष्टीने खानापूर तालुका भाजपाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते तालुक्यात जोरदार तयारी करत असल्याची माहिती भाजपा नेते मंडळींनी भाजपा कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य जोतिबा रेमानी राज्य महिला कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई तालुका पंचायतच्या माजी सदस्या वासंती बडीगेर, भाजपा तालुका जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी,भाजप नेते व भू विकास बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, भाजपा मीडिया प्रमुख राजेंद्र रायका आदिजन उपस्थित होते
नंदगड येथे दोन मार्च रोजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात
नंदगड येथे दोन मार्च 2023 रोजी सकाळी 10-00 वाजता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात होणार असून सदर उदघाटन कार्यक्रमाला व सभेला खानापूर कित्तूर बैलहोंगल बेळगाव परिसरातून 30 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले, कर्नाटक राज्यात रथ यात्रेसाठी चार विभाग बनविण्यात आले असुन नंदगड येथुन क्रांतीवीर संगोळी रायान्ना यांच्या समाधी स्थळाला हार घालून सदर रथयात्रेला सुरुवात होणार आहे या रथयात्रेला विभाग क्रमांक दोन नाव देण्यात आले असून सदर रथयात्रा 52 ठिकाणी फिरणार आहे, रथयात्रेला सुरूवात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, भाजपा राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील माजी मुख्यमंत्री बी एस यडीयुराप्पा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत खानापूर तालुक्यात जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून संपूर्ण तालुक्यात विजय संकल्प अभियान राबविण्यात आले असून तालुक्यातील प्रत्येक बूथ केंद्रातील घरावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले असुन तालुक्यात एकुन पंधराशे झेंडे लावण्यात आले आहेत तसेच मिस कॉल देऊन नवीन हजारो सभासद करण्यात आले आहेत तसेच तालुक्यातील प्रत्येक घरात नरेंद्र मोदी भाजपा सरकारने ज्या योजना केल्या आहेत त्याची माहिती दिलेली असुन प्रत्येक योजना रयत, नागरिक, महिला, यांना समजावून सांगण्यात आलेली आहे, त्यासाठी नंदगड येथे होणाऱ्या या सभेला उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळणार असल्याचे सांगितले तसेच सर्वांनी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेला व नंदगड येथील दिनांक 2 मार्च रोजी होणाऱ्या संकल्प यात्रेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा नेते मंडळींनी केले आहे
