
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले आहेत. त्यामुळे आता गडकरींच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. सकाळपासून तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
