
काल दि 21 नोव्हेंबर रोजी “आपलं खानापूर” मध्ये खानापूर रामनगर महामार्गावर मोहरूम माती ऐवजी साधी माती वापरण्यात येत आहे खासदार साहेब व स्थानिक भाजपा नेतेमंडळींनी याकडे जरा लक्ष द्यावेत म्हणून बातमी आली होती त्याची ताबडतोब दखल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी घेतली व काल ताबडतोब रस्ता होत असलेल्या जागेवर जाऊन ठेकेदारासी चर्चा केली
व याची कल्पना महामार्गाचे अभियंता कीरण यांना त्या ठीकाणाहुनच दिली असता त्यांनी सांगितले की सदर रस्त्यावर जी माती टाकण्यात येत आहे त्याची ताबडतोब टेस्ट करण्यासाठी लँब ला माती पाठवून त्याचे परीक्षण करण्यात येईल व सढळ माती निकृष्ट दर्जाची आढळल्यास जेवढी महामार्गावर माती टाकण्यात आलेली आहे ती संपुर्ण सदर ठेकेदाराला काढून नवीन माती टाकण्यास भाग पाडण्यात येईल असे सांगितले व सदर ठेकेदाराला मोहरूम मातीच वापरण्याची ताकीद दिली,
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी सदर रस्त्याबाबत ताबडतोब दखल घेवून काम तडीस लावल्याबद्दल या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरीकांनी त्यांना त्यांना धन्यवाद दिले असुन समाधानहि व्यक्त केले आहे, यावेळी भाजपा मुख्य मुख्य सचिव गंडु तोप्पीनकटी, गुंजी ग्रां पं सदस्य अमोल बेळगावकर, व आदिजन उपस्थित होते,
