
खानापूर रामनगर अनमोड गोवा महामार्ग कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडला होता तो पुन्हा बनवण्यात येत असून त्या ठिकाणी रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला मोहरम माती टाकण्याऐवजी साधी माती टाकण्यात येत असल्याने त्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे धूळ उडत असून दुचाकी चालकांना येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून तसेच अशीच माती जर टाकण्यात आली तर बनवण्यात येणारा हा रस्ता जास्त काळ टिकणार नसून परत येरे माझ्या मागल्या प्रमाणे रस्त्यावर खड्डे पडून पावसाळ्यात पुन्हा रस्ता बंद होणार यात शंकाच नाही त्यासाठी संबंधित खात्याने सदर ठेकेदाराला सदर रस्त्यावर मोहरम माती टाकण्यास भाग पाडावेत व खासदार अनंत कुमार हेगडे व स्थानिक भाजपा नेत्यांनी यात लक्ष घालावेत अशी मागणी या रस्त्यावरून येजा करणाऱ्या सामान्य नागरिकांतून करण्यात येत आहे
