
लोकसभेचे खासदार आदरणीय श्री.अनंतकुमार हेगडे यांच्या अथक परिश्रमाने व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्यात बीएसएनएल टॉवर्स बसविण्यात येणार आहेत.
अवघ्या सहा महिन्यांत जंगल भागातील देगांव, जामगांव, चीगुळे, मुघवडे, कबनाळी, चापोली, पारवाड, हुळंद, आमगांव, मेंडील, गवाळी, पास्टोली, कोंगळे, या १३ गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर बसवले जाणार आहेत.
जंगल भागातील, सर्व लोकांसाठी नेटवर्क उपलब्ध असावेत आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास असल्याने नेटवर्कमध्ये अडचणी येत होत्या, त्या दुर वाहाव्यात, यासाठी खासदार श्री.अनंतकुमार हेगडे यांच्या सततच्या प्रयत्नातून सर्व जंगल क्षेत्रातील गावांमध्ये बी एस एन एल नेटवर्क टॉवर बसविण्यात येणार आहेत.
याबाबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी लोकसभेचे खासदार श्री.अनंतकुमार हेगडे यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे
