नुकताच मुंबई येथे झालेल्या “मुंबई मॅराथॉन 2023” मध्ये खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अबनाळी गावचा सुपत्र अनंत गांवकर याने 42 की मी फुल मॅराथॉन मध्ये भाग घेवून तीसरा क्रमांक पटकावला व आपल्या अबनाळी गावाबरोबर खानापूर तालुका व आपण शीक्षण घेत असलेल्या इलाइट अकॅडमी चे नाव रोशन केले,
खानापूर औधोगिक वसाहत या ठिकाणी (Airforce) भारतीय वायदलातून सार्जंट म्हणून निवृत्त झालेले आणी देशपातळीवर नावाजलेले अँथलेटिक्स धावपटू जगदिश शिंदे यांनी “Elite Academy” नावाने प्रशिक्षण देणारी संस्था खोलली असून त्या ठिकाणी देशातील उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक व देशातील ईतर राज्यातील खेळाडू प्रशिक्षण घेत असून अनंत गांवकर हा त्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असून, जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच धावपटू म्हणून तयार झाला आहे, जगदिश शिंदे हे शिवाजी नगर खानापूर येथील निवृत्त शिक्षक श्री एस जी शिंदे सर यांचे चिरंजीव आहेत,
इलाइट अकॅडमीच्या खेळाडूंनी दि 8 जानेवारी 2023 रोजी चेन्नई येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅराथॉन स्पर्धेत व ईतर ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेवून विविध पारितोषिक मीळवीलेली आहेत, चेन्नई येथे ग्यान बाबू- फुल मॅराथॉन 42 की मी मध्ये दुसरा क्रमांक, मोनूकुमार हाप – मॅराथॉन 21 की मी, पहिला क्रमांक, शुभम दिक्षीत – तीसरा क्रमांक 32 की मी, रोहित कुमार दुसरा क्रमांक 10 की मी, तर बडोदा येथे झालेल्या स्पर्धेत धर्मेंद्र कुमार – प्रथम क्रमांक age category आणि फुल मॅराथॉन मधुन दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर भरतेश स्कुल मॅराथॉन मध्ये अनंत गांवकर यांने दुसरा क्रमांक व राकेश कुमारने 3 तीसरा क्रमांक पटकावला आहे,