खानापूर समितीच्या जनजागृती दौऱ्याला कणकुंबी येथून सुरुवात
एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त खानापूर तालुक्यामधील मराठी भाषिक गावांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जनजागृती करण्याची सुरुवात कुणकुंबी येथून करण्यात आली. त्याआधी श्री माऊली देवीचे दर्शन घेऊन मराठी भाषिकावर होणारा अन्याय व मराठी भाषिकांची कुचंबना थांबण्यासाठी गेली 65 वर्ष प्रलंबित असणारा सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा यासाठी श्री माऊली देवीला साकडे घालण्यात आले. त्यानंतर कुणकुंबी गावातील घरोघरी जाऊन येणारा एक नोव्हेंबर काळा दिन गावातील मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ पाळून अन्यायाने मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबणाऱ्या केंद्र शासनाचा निषेध करावा, याची खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जागृती केली. कणकुंबी गावातील चौकामध्ये जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना माजी सभापती सुरेश देसाई यांनी येणारा एक नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील प्रत्येक मराठी भाषिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत हरताळ पाळून आपले कामधंदे बंद ठेवून सरकारचा निषेध करावा व खानापूर येथे एक नोव्हेंबर काळा दिन रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निषेध सभा आयोजित केलेली आहे,या सभेमध्ये जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी भाग घेऊन केंद्र शासनाचा निषेध करावा व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा विरोध करावा. यावेळी कणकुंबी गावातील पांडुरंग नाईक, गुंडू नाईक, व्ही एम गवस, विलास नाईक, संजय नाईक, गुंडू गवस मारुती कांबळे, राजू मुगुटकर देवा गवस, विष्णू मुकुटकर, सुमन गवस यशोदा, कांबळे पांडुरंग गुणाजी गवस, रामा कृष्णा गावडे दत्तात्रेय सडेकर, आनंद गावडे, संतोष गावडे, नारायण बांदेवाडकर, पुंडलिक गावडे, गोपाळ गावडे, तसेच गोपाळ पाटील युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पांडुरंग सावंत बळीराम पाटील, दत्तू कुठरे अजित पाटील, राजाराम देसाई निरंजन सरदेसाई, राजू पाटील किशोर हेबाळकर आदी उपस्थित होते
खानापूर समितीच्या जनजागृती दौऱ्याला कणकुंबी येथून सुरुवात
Leave a comment
Leave a comment