मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी मराठी भाषा आणी मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी संपुर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन
त्याची जागृती करण्यासाठी आज जांबोटी भागातील रामगुरवाडी, नागुर्डा, मोदेकोप, ओतोळी, दारोळी, ओलमणी,जांबोटी या गावात म ए समितीच्या वतीने पत्रके वाटून जन जागृती करण्यात आली, यावेळी नारायण कापोलकर, यशवंत बीरजे, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, मरू पाटील, गणपती गावडे, तसेच जांबोटी भागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते,