
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचा धसक्का घेतलेल्या प्रशासनाने समितीच्या कार्यालयासमोर लावलेला मराठी भाषेचा मजकूर असलेला नाम फलक पोलीस बंदोबस्तात पुन्हा काढल्याने समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकातून नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे,
आज परत एकदा प्रशासनाचे अधिकारी पोलीस फौज फाट्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर नाम फलक काढण्यासाठी दाखल झाले असता तेथे उपस्थित असलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारून अडवण्याचा प्रयत्न केला पण पण पोलीस बळाचा वापर करून नाम फलक हटविण्यात आला, त्यामुळे समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते, त्यांनी प्रशासनाचा धिकार करत काही काळ रस्त्यावर बसून आंदोलन केले व प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या,
वरचेवर नाम फलक हटविण्यात येत असल्याने मराठी भाषिकात नाराजी पसरली असून येत्या निवडणुकीत याचे उत्तर मतपत्रिकेद्वारे देण्यात येईल असे संतप्त झालेले कार्यकर्ते व मराठी भाषिक प्रतिक्रिया देत असताना बोलत आहेत,
