
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी सूर्याजी सहदेव पाटील यांची निवड आज नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे समितीचे कार्यकारणी सदस्य श्री पि के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये खानापूर समितीच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर सूर्याजी सहदेव पाटील जळगे यांची एक मताने निवड करण्यात आली,
अध्यक्ष निवडीचे कारण माजी सभापती सुरेशराव देसाई यांनी सांगितले

बैठकीच्या सुरुवातीला तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या समिती कार्यकर्त्यांचे स्वागत करून बैठक बोलवण्यामागचे कारण माजी सभापती श्री सुरेशराव देसाई यांनी एकी संदर्भात झालेल्या घडामोडी स्पष्ट केल्या ते म्हणाले की कोणत्याही जेष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मोजक्याच काही लोकांनी पदाधिकाऱ्यांची निवड केली यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला काहींनी याला विरोध केला बेळगाव वरून आलेल्या निरीक्षक मंडळींनी शिवस्मारक येथे दोन्ही गटांची संयुक्त बैठक बोलावून प्रत्येक गटाचे चार सदस्य नेमून खानापूर तालुक्यातील समितीची एकनिष्ठ असलेल्या व समितीच्या कार्यात वेळ देऊ इच्छिणाऱ्या कार्यकारणी सदस्यांची नावे घ्यावीत असे सुचवण्यात आले

व यासाठी काही दिवसांचा अवधी देण्यात आला होता यानंतर खानापूर येथील शिव स्मारकामध्ये निरीक्षक कमिटी व निवडलेल्या आठ जणांशी चर्चा करून तालुक्याच्या सर्व ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांसमोर कार्यकारिणी जाहीर करण्याचे ठरवण्यात आले असे असताना सुद्धा तालुक्यामध्ये न फिरता घरी बसून कार्यकारणी सदस्यांची नावे घेण्यात आली याची माहिती आपल्या गटाने सर्वांच्या स्वाक्षरीने मध्यवर्ती समितीला सुद्धा कळवली होती आपल्या गटाच्या तीन जणांना विश्वासात न घेता व आपल्या गटाच्या ज्येष्ठ सदस्यांना माहिती न देता पदाच्या हव्यासापोटी आठ जणांपैकी पाच जणांच्या उपस्थित निरीक्षक कमिटीचे अध्यक्ष गैरहजर असताना व मध्यवर्ती समितीच्या बैठकीत विषय न ठेवता तिघांची पदाधिकारी म्हणून कुणाच्या सांगण्यावरून रात्री अकरा वाजता एका कागदाच्या चीटोऱ्यावर पदाधिकाऱ्यांची नाव निश्चित करण्याची घाई का केली याची माहिती आपल्यातील सदस्यांना नव्हती पदाधिकारी निवडत असताना कोणालाही विश्वासात न घेता कार्यकारणी सदस्य निवडायच्या आधी हेके खोरपणाने पदाच्या हव्यासापोटी काहींनी पदावर आपली वर्णी करून घेतली समितीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्यांना समितीच्या विरोधात काम करणाऱ्यांना मुख्यपदे का देण्यात आली

पदाधिकारी निवडताना समितीसाठी आयुष्य घातलेल्या निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्त्यांना माहिती का देण्यात आली नाही तालुक्यातील समितीची कार्यकारणी सदस्यांची निवड केली नसताना पदाधिकारी नेमण्यात इतकी घाई का झाली इच्छुक उमेदवाराकडून भली मोठी रक्कम घेऊन नावाची नोंद करून घेतली हे करत असताना कोणालाही विश्वासात घेतले नाही तसेच यामुळे खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पसरली याला बऱ्याच जणांचा विरोध होता यासाठी घटक समितीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर नव्याने नेमणूक करण्याचे ठरवण्यात आले व या पदावर मध्यवर्ती समितीचे जेष्ठ सदस्य सूर्याजी सदैव पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली माजी सभापती सुरेश देसाई यांनी सूर्याची पाटील यांचे नाव सुचवले व त्यांच्या नावाला समितीचे जेष्ठ कार्यकर्ते बळीराम पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी बैठकीचे अध्यक्ष पि के पाटील यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्ष सूर्याजी पाटील यांचा सत्कार केला यावेळी खानापूर शिवसेनेचे प्रमुख दयानंद चोपडे, विभाग प्रमुख मल्लाप्पा पाटील, सुरेश देसाई, पीएच पाटील, राजू पाटील यांचे अध्यक्षांच्या अभिनंदनाची भाषणे झाली यावेळी श्रीनिवास पाटील, नामदेव पाटील, नामदेव कल्लाप्पा पाटील, विजय पाटील, श्रीपती पाटील, गंगाधर पाटील, प्रकाश पाटील (कुप्पटगिरी) नितेश मिराशी ग्रामपंचायत सदस्य (सातनाळी) दीपक मिराशी विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य (कसबा नंदगड ) रामचंद्र पाटील सुरेश कोलेकर कौदल, बाबांना पाटील, प्रकाश कदम गोधळी, जानोबा बिडकर, पुंडलिक बावकर, सदानंद पाटील, दयानंद पाटील, विठ्ठल पाटील, अनंत पाटील, लक्ष्मण धबाले, भैरू डांगे, श्री सुतार चंद्रकांत टिवळकर, रमेश पाटील, बसवंत हालशिकर, जोतिबा पळशीकर, अर्जुन कोकीतकर, रामू गावडा पाटील, यल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा बावकर, कल्लाप्पा धबाले, लक्ष्मण धबाले, नागराज वाटेवलकर, किसन केसरेकर, नामदेव बिडकर, ईश्वर देगांवकर समितीचे ज्येष्ठ सदस्य संभाजीराव देसाई, दत्तू कुट्रे, बळीराम पाटील, गजानन पाटील, जोतिबा चेन्नवाडकर, शिवाजी चेन्नवाडकर, आधी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते
